पुणे, दि. १६ :- मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर रविवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. लक्झरी बसनं स्विफ्ट कारला मागून जोरदार धडक दिल्यानं दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. गंहुजे गावाजवळ ही घटना घडली. रस्त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या कारला लक्झरी बसनं मागील बाजूनं जोरदार धडक दिली. कारने प्रवास करताना पंक्चर झालेलं टायर बदलत असताना ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये पुण्यातील संचेती हॉस्पिटलचे डॉक्टर केतन खुर्जेकर (वय ४४) व कारचालक विलास भोसले या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. चेतन खुर्जेकर हे संचेती हॉस्पिटलमधील मणक्यांशी संबंधित आजारांचे मुख्य डॉक्टर होते.