नीरा नरसिंगपूर दि.१५:- बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गटातील विकास कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही जिल्हा परिषद सदस्य अंकिता पाटील यांनी शुक्रवारी(दि.13) दिली.निरनिमगाव, चाकाटी, बोराटवाडी, शेटफळ-हवेली येथे पुणे जिल्हा परिषद फंडातून विविध विकास कामांचा शुभारंभ जि.प.सदस्य अंकिता पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आला. सदर प्रसंगी बोलताना अंकिता पाटील यांनी वरील माहिती दिली.निरनिमगाव येथे अंतर्गत रस्त्यासाठी रु.10 लाख , दलित वस्ती सुधारणा योजना अंतर्गत समाज मंदिरासाठी रु.7 लाख, दलित वस्ती कॉंक्रीट रस्ता रु. 5 लाख , 14 व्या वित्त आयोगातून मुरमीकरण रु. 4 लाख , ग्रामपंचायत कार्यालय नूतनीकरण रु. 2 लाख, हायमास दिवा 1,80,000 व स्मशानभूमी वाॅल कंपाऊंड रु. 3 लाख असे एकूण रु. 32 लाख 70 हजार रुपयांच्या विकासामांचे भूमिपूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नीरा-भीमा कारखान्याचे संचालक व गावचे सरपंच प्रतापराव पाटील यांनी केले.
तसेच चाकाटी येथे महादेव मंदिर सभामंडप रु. 5 लाख, बोराटवाडी येथे हेगडकर रस्ता रु.10 लाख,शेटफळ येथे रस्ता रु. 9 लाख याप्रमाणे विविध कामाचे भूमिपूजनही अंकिता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी गावोगावचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बाळासाहेब सुतार निरा प्रतिनिधी