पुणे, दि. १८:- पुणे शहरातील आयटी इंजिनियरच्या गहाळ झालेल्या बॅग अर्ध्या तासात शोध लावून फिर्यादी रॉय यांच्या ताब्यात दिली कामगिरी पुणे गुन्हे शाखेच्या युनिट-४ ने बजावली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, शत्रुघ्न रॉय (वय, ३७ रा. वाघोली) हे इसम युनिट-४ च्या कार्यालयात आले व त्यांनी लॅपटॉप बॅग, त्यात डेल कंपनीचा लॅपटॉप, पाकिट, त्यात २,५००/- रोख, डेबिट कार्ड, क्रेडीट कार्ड व ऑफिसची महत्वाची कागदपत्रं ऑफिसला वाघोली ते बालेवाडी असे दुचाकीवरून जात असताना बॅग गहाळ झाल्याबद्दल सांगितले. त्यात पोलिस कर्मचारी सचिन ढवळे यांनी बॅगमध्ये असलेल्या मोबाईलबाबत माहिती घेऊन तांत्रिक माहितीच्या आधारे लॅपटॉप व मोबाईल शिवाजीनगर मनपा भागात असल्याचे कळाले. सदर ठिकाणी जाऊन शोध घेतला असता लॅपटॉप बॅग, त्यात लॅपटॉप रू. ५७,०००/-,मोबाईल किंमत १०,५००/- रूपये, पाकिट त्यात २,५००/- रोख, डेबिट कार्ड, क्रेडीट कार्ड, कंपनीची महत्वाची कागदपत्र अशा एकूण ७० हजाराच्या वस्तू मिळाल्या.
रॉय हे बालेवाडी येथील रिमोन्स टेक्नॉलॉजी या खाजगी कंपनीत क्वालिटी इंजिनियर म्हणून नोकरीस असून ते मुळ झारखंड राज्यातील जमशेदपूर येथील आहेत. त्यांनी युनिट-४, गुन्हे शाखा पुणे शहर व पुणे शहर पोलिसांचे आभार मानले आहेत.