मुंबई,दि.०१:- सायंकाळी शपथविधीच्या कार्यक्रमानंतर मंत्रीमंडळाची पहिली बैठक संपल्यावर महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट गोवा गाठले. शिवसेनेचे ३९ बंडखोर आमदार गोव्यामध्ये वास्तव्यास असणाऱ्या ताज हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत.याच हॉटेलमध्ये मुख्यमंत्री शिंदे मध्यरात्रीनंतर पोहोचले. यावेळी शिवसेना आणि सहयोगी आमदारांच्या वतीने त्यांचं जंगी स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतही उपस्थित होते. त्यांनी पुष्पगुच्छ देऊन शिंदे यांचे मुख्यमंत्री झाल्याबद्दल अभिनंदन केले. शिवसेनेच्या महिला आमदारांनी त्यांना ओवाळून त्यांचं स्वागत केलं. यावेळी आमदारांनी आपल्या हस्ते पेढा भरवत त्यांचं तोंड गोड केलं