पुणे दि ,०६: -महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने येत्या पौर्णिमेला तुमच्यासाठी खास घेऊन येत आहोत “केशराचा पाऊस…नागपूर, दि. 9 नोव्हेंम्बर 2019:- महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे पर्यटक निवास बोधालकसा हे निसर्गाच तरल सौंदर्य प्राप्त असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा शहराच्या अगदी जवळ वसलेलं आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास
महामंडळाद्वारे दर पौर्णिमेला सर्व पर्यटक निवासात पौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. महोत्सवाच्या माध्यमातून स्थानिक कलाकारांना आपली कला दर्शविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे व आपली पारंपारिक कला, संस्कृती, साहित्य याची ओळख पर्यटकांना करून देणे हा या महोत्सवाचे आयोजना मागील मुख्य उदेश आहे. महामंडळाद्वारे येत्या पौर्णिमेला दि.11/11/2019 रोजी निसर्गरम्य पर्यटक निवास बोधालकसा येथे पौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये पर्यटकांच्या मनोरंजनासाठी वन्यजीव अभ्यासक व जेष्ठ लेखक श्री. मारुती चितमपल्ली यांच्यासोबत रंजक रानगप्पा होणार आहेत. सदर पौर्णिमा महोत्सवच्या माध्यमातून पर्यटकांमध्ये निसर्ग तसेच वन्यजीवांविषयी गोडी निर्माण व्हावी हा महामंडळाचा मानस आहे.
श्री. मारुती चितमपल्ली यांच्याविषयी जाणून घेऊ
मराठी साहित्यात निसर्ग चित्रणाची हिरवी वाट निर्माण करणारे, “पक्षी जाय दिगंतरा” सारख्या अनेक प्रसिद्ध साहित्यकृती साकारणारे, सोलापूरच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवणारे, “विंदा करंदीकर” सारख्या अनेक पुरस्काराने गौरवलेले, ललित लेखक, वनविद्येचे जाणकार, कोषागार, अनुवादक, शब्दशिल्पी अश्या नानाविध विशेषणांनी संबोधले जाणारे श्री. मारुती चितमपल्ली यांचा निसर्ग विषयात अफाट अभ्यास आणि अनुभव आहेत. अश्या या चितमपल्लीच्या निसर्गाविषयीची आत्मीयता जवळून जाणून घेणाऱ्या पर्यंटकांची सहल नक्कीच अविस्मरणीय आणि भरघोस ज्ञान प्राप्त करून देणारी ठरणार आहे.