पिंपरी चिंचवड,दि.०४:- मावळ सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार श्रीरंग चंदू बारणे यांना निवडणूक निरीक्षक बुदीती राजशेखर, मतमोजणी निरीक्षक मोहम्मद हारुण यांच्या उपस्थितीत मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांच्या हस्ते निवडणूक प्रमाणपत्र देण्यात आले.
मावळ लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत 33 उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीची मतमोजणी बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे मतमोजणी कक्षात आज सुरळीत पार पडली, या निवडणुकीमध्ये बारणे विजयी झाले. त्यांना आज बालेवाडी येथील मतमोजणी कक्षात निवडणूक प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी मावळ लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाचे निवडणूक समन्वयक प्रवीण ठाकरे,हिम्मत खराडे, पनवेल, कर्जत, उरण,मावळ, चिंचवड, पिंपरी विधानसभा मतदार संघांचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अनुक्रमे राहुल मुंडके, अजित नैराळे, जनार्दन कासार, सुरेंद्र नवले, विठ्ठल जोशी, अर्चना यादव, निवडणूक सहाय्यक अभिजीत जगताप, सचिन मस्के, मनीषा तेलभाते, मुख्य माहिती तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमन, मनुष्यबळ कक्षाचे समन्वयक राजू ठाणगे, निरीक्षक समन्वयक प्रमोद ओंभासे, माध्यम कक्ष समन्वयक किरण गायकवाड आदी उपस्थित होते.