पुणे,दि.१६:- पुणे परिसरात काल दुपारच्या वेळी उन पडलेल जाणवतं. दरम्यान, हवामान विभागानं (काल (दि. 15) सायंकाळी पुण्यात. दुपारी साडेतीन-पावणे चार वाजण्याच्या दरम्यान काही ठिकाणी गारांचा पावसाला सुरूवात झाली होती. पुणेकरांनी सतर्क राहावे असा इशाराच देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये शहर, जिल्हयासह राज्यातील तापमानाचा पारा वाढला आहे आणि त्यानंतर ठिकठिकाणी अवकाळी पाऊस पडला आहे.
केरळ ते छत्तीसगड दरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून सध्या आकाशात मोठे ढग तयार होण्यासाठी सुरूवात झाली आहे. काही मोठे ढग हे पुणे शहर आणि जिल्हयात येत आहेत. त्यामुळेच हवामान विभागानं पुणे शहर आणि जिल्हयात यलो अलर्ट जारी केला आहे. वादळी वार्यासह विजांचा कडकडाट होऊन जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. शहराच्या लगतच्या भागात दुपारी 4 नंतर पावसाला सुरूवात होईल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
पुणेकरांनी ढगांच्या गडगडाटावेळी वृक्षाखाली आसरा घेऊ नये, पाऊस पडल्याने रस्त्यावर वाहने घसरतात
त्यामुळे चालकांनी वाहने सावकाश चालवावीत. वीजांचा कडकडाट सुरू असताना मोबाईलचा वापर करू नये आदी सुचना हवामान विभागानं दिल्या आहेत.व पुण्यात अनेक भागात गारांचा पाऊस पडला. अशातच पुण्यातील कात्रज घाटात पडलेल्या गारांचा पावसाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मिनी काश्मीर म्हणून चांगलाच व्हायरल होत आहे. पुणे शहरासह उपनगरांमध्ये पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आल्यानंतर पुढीन दोन दिवस पुण्यात अवकाळी पाऊस असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे.