पुणे, ता.२२ : पुणे परिसरातील काही उच्चभ्रू युवक मौजमजा, चैन करण्यासाठी हुक्का पार्लरमध्ये येऊन व्यसन करताना पाहण्यास मिळत आहे. तर दुसऱ्या बाजुला हुक्का पार्लरमधील हुक्का पेटवून देण्याचे काम करणारे केवळ नोकरी टिकावी म्हणून अवघ्या काही वयात आलेल्या कामगार कधी व्यसनाच्या आहारी जातात हे त्यांना सुध्दा कळत नाही. ही खरी यंग मुलांन मध्ये शोकांतिका असल्याचे दिसून येते.पुण्यातील ग्रामीण, पुणे शहर व पिंपरी चिंचवड येथील काही ठिकाणी
अशा आवैद्य हॉटेल्स मध्ये व हुक्का पार्लरमध्ये वेटरचे काम करणारी मुले हुक्का पेटविण्याचे काम करतात. हुक्का चांगला पेटण्यासाठी ही मुले आधी स्वत: हुक्का ओढतात. पार्लरमध्ये अनेकजण आंबट शौकीन व्यसनामुळे हुक्का ओढण्यासाठी येतात. अशा ग्राहकांचे हुक्के पेटविण्यासाठी त्यांना हुक्क्याचे झुरके ओढावे लागतात. त्यामुळे ते नकळत कधी व्यसनाच्या आहारी जातात हे त्यांना कळतच नाही.यांना रात्रभर झोप नसते. दिवसा काही तास झोप घेतल्यानंतर पुन्हा नोकरी टिकविण्यासाठी कामावर जावे लागते. त्यामुळे हे कामगारच अधिक नशे मध्ये असतात.
हुक्क्यासाठी लागणारे कोळशाचे पेटते निखारे देणे, ग्राहकाला हुक्का ओढताना किक बसली नाही कि पुन्हा दुसरा हुक्का आणून देणे. तो हुक्का चांगला व्हावा म्हणून भराभर हुक्क्याचे झुरके घेणे त्यांचे सुरू असते. काही श्रीमंत कुटुंबातील व्यसनाधिन गेला तर त्याला परत व्यसनमुक्ती केंद्रात ठेऊन त्यांना व्यसनमुक्त करणे शक्य असते. मात्र कुटुंबाचा आधार असलेल्या मुलांचे भविष्य काय असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. अशा मुलांना व्यसनामुळे इतर आजार ओढवल्यास त्यांना कामावरून काढून टाकले जाते. अशा असंख्य युवकांचे पुढे काय होते, असा प्रश्न पडतो. मात्र, याची काळजी ना सरकारला ना पोलीसांना असते. कित्येक पिढ्या व्यसनाधितेमध्ये अडकुन आपले आयुष्य संपवितात. या मध्ये शौक म्हणून श्रीमंत आणि पोटासाठी नोकरी म्हणून काम करणारे गरीब या दोन्ही वर्गातील युवकांचे आयुष्य बरबाद होते. यावर कायमस्वरुप उपाययोजना कधी होणार हा खरा प्रश्न आहे.
‘‘ हुक्का पेटविणारी मुले खरीच व्यसनाधिन झाल्याच्या अनेक घटना पुण्यात पाहण्यास मिळत आहे