पुणे, दि. १३: राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथक क्र.१ च्यावतीने शिरुर तालुक्यातील शिक्रापूर गावातील वेळ नदीकाठी अवैधरित्या गावठी दारुनिर्मिती करणाऱ्या अड्ड्यावर कारवाई करुन १ हजार ३०० लिटर रसायन व ७० लिटर गावठी दारु असा ५९ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी आरोपी अरमान कंकराज बिरावत याच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र. १. पुणे पथकाचे निरीक्षक देवदत्त पोटे, दुय्यम निरीक्षक डी. एस. सुर्यवंशी तसेच जवान सूरज घुले, जयराम काचरा, मुकुंद पोटे, शरद हांडगर, शाहिन इनामदार यांनी सहभाग घेतला.
नागरिकांना अवैध मद्य निर्मिती, विक्रीबाबत माहिती मिळाल्यास राज्य उत्पादन शुल्क, पुणे विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक चरणसिंग राजपूत यांनी केले आहे.