पुणे,दि.०३:- पुण्यातील कोंढवा-कात्रज रोड येथुन बोलेरो पिकअप वाहनातून गावठी दारुची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती. दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाला मिळाली व पिकअप व्हॅन टेम्पो पकडला व ४ लाख १२ हजार रुपयांची गावठी दारु जप्त केली आहे. भगत गणेश प्रजापती (वय २४, रा. बगळे मळा, उरळी कांचन) याला अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक संदिपान पवार यांचे पथक गुन्हे प्रतिबंध गस्त करीत होते. कात्रज – कोंढवा रोड बायपासने ते जात असताना पोलीस अंमलदार विनय येवले यांना एका बोलेरो पिकअप गाडी संशयरितया जाताना दिसली. त्यांनी गाडी थांबून आतील बाजूला चेक केले तर त्यात १ लाख ५७ हजार ५०० रुपयांची ४५ प्लास्टिक कॅनमध्ये प्रत्येकी ३५ लिटर अशी एकूण १५७५ लिटर गावठी हातभट्टी तयार दारु मिळून आली.
पोलिसांनी या दारुसह मोबाईल, बोलेरो पिकअप असा एकूण ४ लाख १२ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.
ही कामगिरी सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे व दरोडा व वाहन चोरी पथकातील पोलीस निरीक्षक संदिपान पवार,
तसेच सहायक पोलीस निरीक्षक बेरड, पोलीस अंमलदार विनय येवले यांनी केली आहे.