पुणे,दि.२६ :- पुण्यातील हडपसर परिसरातील ससाणेनगर येथे काल दुपारी 16/00 वा. चे सुमारास न्यू रॉयल ऑटो गॅरेज च्या समोर ससाणे नगर रेल्वे गेटच्या जवळ एक्टिवा वरील इसमांना मारहाण करत असल्याने व त्यांच्याकडे कोयता असल्याने तेथून जाणारे वानवडी पोलीस स्टेशन कडील एपीआय रत्नदीप गायकवाड हे त्यांची गाडी थांबवून भांडणे सोडवण्यासाठी व नमूद इग्नेटर वरील इसमांकडून कोयता काढून घेण्यासाठी त्यांचे जवळ जात असताना इग्नेटर वरील इसम नामे निहालसिंग मन्नू सिंह टाक याने त्याच्याकडील कोयता एपीआय रत्नदीप गायकवाड यांना फेकून मारला.तो कोयता त्यांचे डोक्यात लागला असून, एपीआय रत्नदीप गायकवाड कोयत्याने वार करुन पसार झालेल्या सराइतांना गुन्हे शाखेने सोलापूर परिसरातून अटक केली. निहालसिंग मन्नूसिंग टाक (वय १८, रा. तुळजाभवानी वसाहत, हडपसर), राहुलसिंग उर्फ राहुल्या रवींद्रसिंग भोंड (वय १९, रा. हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
हडपसर भागातील ससाणेनगर परिसरात रविवारी दुपारी चारच्या सुमारास दोन दुचाकीस्वारांमध्ये वाद सुरू होते. त्या वेळी एका दुचाकीस्वाराच्या बाजूने आरोपी निहालसिंग आणि राहुलसिंग भांडण करत होते. आरोपींच्या हातात कोयता होता. त्या वेळी तेथून निघालेले सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड यांनी आरोपींना पाहिले. गायकवाड यांनी भांडणात मध्यस्थी करून आरोपी निहालसिंग टाक याच्या हातातील कोयता काढून घेण्याचा प्रयत्न केला. झटापटीत टाकने कोयता फेकून मारल्याने गायकवाड यांच्या कपाळाला गंभीर दुखापत झाली. टाक आणि साथीदार भोंड पसार झाले.
पोलीस उपायुक्त आर. राजा यांनी घटनास्थळी भेट दिली, तसेच पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सहायक निरीक्षक गायकवाड यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. पसार झालेल्या सराइतांना पकडण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने टाक आणि भोंड यांना सोलापूर परिसरातून ताब्यात घेतले.